Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बळसाणे घरफोडी प्रकरणाचा छडा! ६ तोळे सोने व लाखोंचा ऐवज जप्त; निजामपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

 सहसंपादक अनिल बोराडे 

साक्री: साक्री तालुक्यातील बळसाणे येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा निजामपूर पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ तोळे सोने आणि रोख रकमेसह एकूण ४ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

बळसाणे येथील शांताराम गोरख पाटील हे दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ ते १९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान धार्मिक विधीसाठी नाशिक येथे गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा उचकटून घरफोडी केली. पाटील यांनी परत आल्यानंतर निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २१/०९/२०२५ रोजी तक्रार दिली. त्यानुसार निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुरनं-२५२/२०२५ भा.न्या.सं.का.-२०२३ चे कलम ३०५, ३३४(१), ३३१(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.



पोलिसांची तपासणी आणि अटक

गुन्ह्यात कोणताही सबळ पुरावा नसताना, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) मयुर भामरे यांनी गुप्त बातमीदारांच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर तपास सुरू केला. तपासात अजय बापु कोळी, मुकेश पावबा धगर, आणि दिपक पंडीत शिरसाठ (सर्व रा. बळसाणे, ता. साक्री, जि. धुळे) यांनीच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना मुंबई येथून परत येत असताना दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री २ वाजता रायपूरबारी येथे नाकाबंदी दरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलसह पकडले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीला पहाटे ३ वाजता अटक करण्यात आली.

गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल जप्त

अटक केलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सुरुवातीस २ दिवस आणि नंतर ३ दिवस, असे एकूण ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींनी चोरलेले ६ तोळे सोने बृहन्मुंबई (Greater Mumbai) येथून निजामपूर पोलीस पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईत ६ तोळे सोने, रोख रक्कम व इतर असा एकूण ४ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांच्या पथकाची कामगिरी

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री एस.आर. बांबळे, आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, धुळेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मयुर एस. भामरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली.

या पथकात सपोनि प्रियदर्शनी थोरात, पोउपनि चंद्रकांत गायकवाड, पोउपनि मधुकर सोमोसे, पोउपनि यशवंत भामरे, असई पाटील (स्थागुशा धुळे), असई रुपसिंग वळवी, पोहेकॉ प्रदीपकुमार आखाडे, पोहेकॉ नारायण माळचे, पोहेकॉ आर.यु.मोरे, पोहेकॉ प्रशांत ठाकुर, पोकॉ दिपक महाले, पोकॉ राकेश बोरसे, पोकॉ गौतम अहिरे, पोकॉ परमेश्वर चव्हाण, पोकॉ शरद पाटील, पोकॉ टिलु पावरा, पोकॉ मुकेश दुरगुडे, पोकॉ श्रीराम पदमर, आणि चापोकॉ मनोज माळी यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments