Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गरबा स्पर्धेत कर्म आ.मा. पाटील विद्यालय पिंपळनेरचा दबदबा: प्रथम क्रमांकासह २१ हजारांचे बक्षीस जिंकले!

              सहसंपादक=अनिल बोराडे 


पिंपळनेर, दि. ०२ ऑक्टोबर २०२५

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गांधी चौकात झालेल्या भव्य गरबा-दांडिया स्पर्धेत पिंपळनेर येथील कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींच्या ग्रुपने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

पिंपळनेर शहराचे वैशिष्ट्य असलेल्या गांधी चौकात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गांधी चौक नवदुर्गा मित्र मंडळाने 'नवरात्र गरबा दांडिया स्पर्धा २०२५'चे आयोजन केले होते. या स्पर्धेला शहरातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सर्व सहभागी स्पर्धकांमधून उत्कृष्ट गरबा नृत्य सादर करणाऱ्या ग्रुप्समधून विजेते म्हणून पाच क्रमांक निवडण्यात आले.



उत्कृष्ट सादरीकरणामुळे २१ हजारांचे बक्षीस

कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरबा ग्रुपला त्यांच्या अप्रतिम आणि ऊर्जापूर्ण सादरीकरणाबद्दल प्रथम क्रमांकाचे २१,०००/- (एकवीस हजार रुपये) रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या विजयी ग्रुपमध्ये दुपारच्या सत्रातील समीक्षा चौधरी, मनवा राशिनकर, दुर्गाक्षी सोनवणे, लावण्या गांगुर्डे, काव्या जैन, भूमी शहा, निधी जाधव, विभूती तिवारी, ऐश्वर्या जगताप, अनन्या पवार, हंसिका भामरे आणि कृष्णा नांद्रे या विद्यार्थिनींचा समावेश होता.

मार्गदर्शक आणि मान्यवरांकडून कौतुक

या घवघवीत यशाबद्दल पिंपळनेर शहरवासीय, नवदुर्गा मंडळाचे सदस्य आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले आहे. या ग्रुपला विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती एम. आर. सूर्यवंशी आणि एस. एच. कोठावदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींचे पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. बाळासाहेब आर.एन. शिंदे, उपाध्यक्ष सुरेंद्र विनायकराव मराठे, संस्थेचे सचिव ए.एस. बिरारीस, शा.स. चेअरमन सुभाषशेठजी जैन, शा.स. व्हा.चेअरमन डॉ. श्री. विवेकानंद शिंदे, कॉ.क. चेअरमन धनराजशेठ जैन, वसतीगृह चेअरमन एच.आर. गांगुर्डे, रामचंद्र पुंडलिक भामरे, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, तसेच मा. मुख्याध्यापक, पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

0 Comments