सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: कै. आ. मा. पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका आणि उपक्रमशील शिक्षिका श्रीमती करिश्मा रमेश जैन यांना शिक्षक दिनानिमित्त शांतीराज फाऊंडेशन, पिंपळनेर यांच्यावतीने 'आदर्श शिक्षक' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हा पुरस्कार सौ. शोभा अशोक जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. करिश्मा जैन यांचा हा गौरव केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही अभिमानास्पद आहे.
याप्रसंगी शांतीराज फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. धनराज जैन, उपाध्यक्ष श्री. उमेश जैन, सचिव श्री. अशोक जैन, श्री. कांतिलाल बाफना, हस्ती बँकेचे चेअरमन श्री. कुंदनमल गोगड, पी.एस.आय. किरण बर्गे, डॉ. गिरीश जैन, दिनेश जैन आणि मोहित जैन उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना करिश्मा जैन यांनी हा पुरस्कार संस्था परिवार, गोगड परिवार आणि त्यांचे विद्यार्थी यांना समर्पित केला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे, संचालक कुणाल गांगुर्डे, यजुर्वेद्र मराठे, जयेश मराठे, प्राचार्या श्रीमती एस.एस. पवार मॅडम आणि पर्यवेक्षक डी.पी. कुंवर यांनी अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments