सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. लहू पवार यांनी शिक्षकांच्या योगदानाला आदराने गौरवताना, शिक्षक केवळ अभ्यासक्रम शिकवत नाहीत, तर एक सुसंस्कृत आणि निकोप पिढी घडवण्याचं महत्त्वाचं काम करतात, असे प्रतिपादन केले.
शिक्षकांचे समाजातील योगदान
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पवार यांनी सांगितले की, शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी शिक्षकांना केवळ स्वतःच्या गुणवत्तेवर लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. तसेच, विद्यार्थी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू पवार यांच्यासह आयक्यूएसी संयोजक डॉ. एस.पी. खोडके, डॉ. के.एन. वसावे, डॉ. संजय तोरवणे, डॉ. योगेश नांद्रे, डॉ. नितीन सोनवणे, प्रा. सी.एन. घरटे, प्रा. डी.बी. जाधव, प्रा. हितेश वानखेडे, प्रा. धनराज पवार, संदीप अमृतकर, नरेंद्र ढोले, रवींद्र शेलार, कैलास जिरे तसेच बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तोरवणे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. के. एन. वसावे यांनी केले. शेवटी डॉ. योगेश्वर नांद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. एस.पी. खोडके आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उपस्थितांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments