Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींची सुनावणी

 संपादकीय 

नवापूर:नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला होता. या प्रस्तावास विभागीय आयुक्त, नाशिक यांनी मान्यता दिली होती.

प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आलेल्या हरकती व सूचनांच्या कालावधीत नवापूर नगरपालिकेत एकूण 5 हरकती प्राप्त झाल्या होत्या.



या हरकतींवर 08 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सविस्तर सुनावणी घेतली. या सुनावणीला जिल्हा सहआयुक्त श्री. जमीर लेंगरेकर, नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच हरकतदार आणि त्यांचे वकील उपस्थित होते.

या प्रक्रियेनंतर प्रभाग रचनेवरील अंतिम निर्णयासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, ज्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीची दिशा स्पष्ट होण्यास मदत होईल.

Post a Comment

0 Comments