Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सामाजिक वसा असलेला पिंपळनेरचा अष्टपैलू 'सनी' अकाली हरपला..शहरा सह पंचक्रोशीतील शोककळा

 सहसंपादक अनिल बोराडे

पिंपळनेर.. हसमुख चेहरा, सर्वांशी आपुलकीचा संवाद आणि मदतीसाठी कायम पुढे असणारा हात... पिंपळनेर शहराचा हा लाडका मित्र, कैलासवासी दिग्विजय लक्ष्मीकांत अहिरराव, उर्फ 'सनी', याने जगाचा निरोप घेतल्याने अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे. शनिवारी सकाळी १२ वाजता पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि अनेकांना मोठा धक्काच बसला. नियतीने असा घात केला की, पिंपळनेरचा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि तरुणाईचे प्रेरणास्थान



पुण्यामध्ये बजाज ऑटो लिमिटेड कंपनीत अग्निशामक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सनी, त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे आणि मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनले होते. मित्रांसाठी ते एखाद्या तावीजसारखे होते, संकटकाळात धावून जाणारे आणि मदतीचा हात देणारे. मग ती रात्रीची वेळ असो वा दिवसाची, कुणीही मदतीसाठी हाक मारली की, सनी तिथे हजर असायचे. त्यांचा साधा, सरळ स्वभाव, समाजातील प्रत्येक घटकाला आपलंसं करणारी व्यक्तीमत्त्व आणि ज्येष्ठांप्रती असलेला आदर तरुणाईसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिला. त्यांच्या जाण्याने केवळ अहिरराव कुटुंबाचीच नव्हे, तर शहरा सह पिंपळनेर पंचक्रोशीतील मोठी हानी झाली आहे.

अश्रुपूर्ण निरोप

कै. लक्ष्मीकांत एकनाथ अहिरराव (नंदू बापू) यांचे चिरंजीव, निखिल लक्ष्मीकांत अहिरराव यांचे मोठे बंधू आणि चि. परीक्षित दिग्विजय अहिरराव (रुद्र) यांचे वडील असलेल्या सनी यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुःखद प्रसंगी त्यांच्या निवासस्थानी मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली आहे.



या दुःखाच्या प्रसंगी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि मनात एकच प्रश्न आहे, 'इतका चांगला माणूस इतक्या लवकर का गेला?' सनी अहिरराव यांची उणीव पिंपळनेर शहराला नेहमीच भासत राहील. ईश्वराने अहिरराव कुटुंबाला हे प्रचंड दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, हीच प्रार्थना.

नवापूर गर्जना न्युज चॅनल नेटवर्क व न्युज वेब पोर्टल व पिंपळनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

0 Comments