सहसंपादक अनिल बोराडे
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने दैनिक अमरावती दर्शनचे आवृत्ती प्रमुख श्री विजयकुमार बुंदेला यांची विदर्भ अध्यक्षपदी निवड केली आहे. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या बुंदेला यांच्या योगदानाला गौरव म्हणून ही निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल बोलताना, श्री. बुंदेला यांनी संघाच्या नियमांनुसार काम करत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. ही निवड ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
श्री. बुंदेला यांच्या निवडीवर संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्यासह पंडित मोहिते-पाटील, अनिल राठोड, डॉ. सुधाताई कांबळे, प्रशांत विलणकर, दीपरत्न निलंगेकर, सचिन जाधव अशा अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्रातील विविध जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केले.
श्री. बुंदेला यांना यापूर्वी त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या नव्या वाटचालीस संघाकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Post a Comment
0 Comments