सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार: नंदुरबार येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम महान शास्त्रज्ञ आणि समाजसुधारक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी रसायनशास्त्र आणि विज्ञानाचे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले. तसेच, संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी यांनी रसायनशास्त्राचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता कक्ष विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एम. आर. पाटील यांनी केले, तर रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला एनसीसी प्रमुख डॉ. विजय चौधरी आणि डॉ. अनिल कुलकर्णी यांचीही विशेष उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. जी. आर. गुप्ता, डॉ. वाय. व्ही. मराठे, प्रा. कल्पेश पाटील, प्रा. कल्पेश सावंत, प्रा. पूनम बागुल, प्रा. ज्योती पाडवी, प्रा. इंद्रसिंग वसावे, प्रा. बादल वळवी, आणि प्रा. गणेश बागुल यांनी मोलाचे सहकार्य केले.
Post a Comment
0 Comments