नंदुरबार, ७ जुलै २०२५: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भुरीवेल येथील लघू पाटबंधारे प्रकल्पात पाण्याची पातळी वाढल्याने, सुकी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्यम पावसामुळे प्रकल्पाची पाणी पातळी १०७.०० मीटर पर्यंत पोहोचली असून, सध्या हा प्रकल्प आपल्या क्षमतेच्या १०७% भरला आहे.
नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय युनिटने दिलेल्या माहितीनुसार, भुरीवेल प्रकल्प १००% क्षमतेने ओव्हरफ्लो होत असून सांडव्यावरून पाणी सोडणे सुरू आहे. यामुळे सुकी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
या गावांनी विशेष काळजी घ्यावी:
भुरीवेल,थुवा,आमपाडा,गडद,खाटीजांबी
आणि सुकी नदीकाठची इतर गावे
ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीने नदीपात्रात जाऊ नये आणि गुरेढोरे नदीच्या पात्रात सोडू नयेत. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपल्या सुरक्षिततेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Post a Comment
0 Comments