सहसंपादक अनिल बोराडे
नाशिक: बागलाण तालुक्याची 'मुलुख मैदानी तोफ' म्हणून ओळखले जाणारे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अरविंदजी सोनवणे (साहेब) यांना रविवार, २९ जून २०२५ रोजी नाशिक येथे प्रतिष्ठेच्या 'जीवन गौरव पुरस्कार २०२५' ने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.
सटाणा येथील रहिवासी असलेले अरविंदजी सोनवणे यांनी अनेक वर्षे नगरपालिकेच्या विविध पदांवर कार्यरत राहून शेती, माती आणि राजकारणात सक्रिय योगदान दिले आहे. त्यांचे स्पष्ट आणि निर्भीड व्यक्तिमत्व, तसेच इतरांना जीव लावणारा स्वभाव यामुळे ते सर्वपरिचित आहेत. वयाच्या एकसष्टीमध्ये त्यांना हा 'जीवन गौरव' पुरस्कार मिळाल्याने राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
द पवार गार्डन, नाशिक येथे झालेल्या या सोहळ्यात मा. डॉ. शेफालीताई भुजबळ (चीफ ॲडमिनिस्ट्रेटर, भुजबळ कॉलेज नाशिक), मा. श्री. सुनील पवार (पोलिस निरीक्षक क्राईम, पंचवटी पो.स्टे.), मा. श्री. एम. आर. डावरे (डायरेक्टर, लायन्स क्लब ऑफ नाशिक शहर), मा. डॉ. विठ्ठलसिंग ढाकरे (प्राध्यापक हिंदी विभाग अध्यक्ष) आणि मा. महंत श्री डॉ. भक्ति चरणदासजी महाराज (अ. भा. आखाडा परिषद राष्ट्रीय प्रवक्ते) यांच्या हस्ते अरविंदजी सोनवणे यांना गौरवण्यात आले. यावेळी संस्थेच्या संस्थापिका सौ. मेघा शिंपी, कार्याध्यक्ष श्रीमती मंजुताई जाखाडी आणि महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉ. अनिल नहार यांची प्रमुख उपस्थिती होती. शेकडो साहित्यिकांच्या टाळ्यांच्या गजरात हा सोहळा पार पडला.
अरविंदजी सोनवणे यांना यापूर्वीही अनेक नामांकित संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. 'साहेबांचा गौरव हा त्यांच्या कार्याचा आणि समाजाचा गौरव आहे,' अशा प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत आहेत. त्यांचे गावकुसाचे मित्रवर्य आणि गावगाडाकार साहेबराव नंदन तात्या यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
Post a Comment
0 Comments