सहसंपादक अनिल बोराडे
धुळे येथील भावेश पाटील यांना आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत दोन सुवर्णपदक प्राप्त झाले त्याबद्दल योग शिक्षक संघातर्फे त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. थायलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा रँकिंग चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत भावेश विलास पाटील यांनी दोन सुवर्णपदक पटकावून धुळे जिल्ह्याची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली असून धुळे जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर प्रस्थापित केले आहे. ट्रॅडिशनल योगा व आर्टिस्टिक सोलो योगा प्रकारात हे सुवर्णपदक प्राप्त केले आहे .या स्पर्धेचे उद्घाटन बँकॉक येथील पतंजली योग हेल्थकेअर संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद झकेरिया ,प्रेम योग आणि आयुर्वेदिक सेंटरचे रंधा नारद व बीटा शेट्टी तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सेक्रेटरी एस मारिया यांच्या हस्ते या योगासन स्पर्धेचे उद्घाटन झाले .या यशाबद्दल भावेश पाटीलचा सत्कार महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघाच्या धुळे जिल्हा कार्यकारिणी तर्फे करण्यात आला
यावेळी महाराष्ट्र योग संघटना धुळ्याचे राज्य उपाध्यक्ष नरेंद्र गांगुर्डे ,राज्य संयुक्त सचिव विजय जाधव ,धुळे जिल्हा अध्यक्ष सौ मनीषा राजेंद्र चौधरी जिल्हा महासचिव जयंत विभांडिक जिल्हा कोषाध्यक्ष संदीप कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रशांत जाधव विश्वनाथ सोमवंशी दीपश्री कुलकर्णी उर्मिला पाटील ,सचिव रत्न सपकाळ ,संघटन सचिव जितेंद्र सोनजे गिरीश अरोरा कार्यालय सचिव शिवाजी आटले मीडिया प्रभारी लक्ष्मण दहीहंडे , सदस्य रेणुका गाडेकर , पि. व्ही मंडले ,शुभांगी गांगुर्डे, शिल्पा जाधव , ,राजेंद्र धाकड भगवान पाटील यांनी त्यांचा शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व धुळे जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावल्याबद्दल त्याचे विशेष कौतुक करण्यात आले. या प्रसंगी त्यांचे पिताश्री विलास पाटील व आई सुनीता पाटील उपस्थित होते. भावेश याने योगाचे बेसिक प्रेरक पुरक चे धुळे योग विद्या धाम येथे घेतले आहे योग डिप्लोमा धुळे येथील योग विद्याधाम येथे केला आहे तसेच एम ए योगा चे शिक्षण शिरपूर येथील योग विद्या धाम येथे केले आहे
Post a Comment
0 Comments