Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुरावा; गुजरातचे उद्योग येणार महाराष्ट्रात

 नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता


नवापूर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधांतर्गत उद्योगधंद्यांसाठी उच्च क्षमतेचे विद्युत रोहित्र मंजूर झाले असून, त्याची जोडणी करण्यास मान्यता मिळालेली आहे. याबाबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून मागणी केली होती. उच्च क्षमतेच्या विद्युतीकरणामुळे गुजरातचे उद्योग महाराष्ट्रात अर्थातच नवापूर एमआयडीसीत येतील.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या निवेदनाची दखल घेतलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून उद्योजकांनी महाराष्ट्रात येऊन उद्योग सुरु करावे म्हणून महाराष्ट्र शासन प्रोत्साहनपर धोरण राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवापूर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर गुजरातचे उद्योजक हे नवापूर एमआयडीसीमध्ये  उद्योग सुरु करण्यासाठी प्रेरीत झाले आहेत. 




परंतु,याठिकाणी एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग प्रकल्प येत असतांना पायाभूत सुविधा म्हणजेच विद्युत जोडीणी उद्योजकांना मिळत नसल्याने त्या उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विज जोडणी मिळत नसल्याने सुरतच्या उद्योजकांना उद्योग सुरु करण्याचा कल थांबला होता. 


नवापूरचा एमआयडीसीमध्ये येणाऱ्या उद्योजकांना जर विद्युत जोडणी उपलब्ध करुन दिल्यास गुजरात राज्यातील टेक्सटाईल उद्योग मोठया प्रमाणावर येण्यास तयार त्यांनी शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आ.रघुवंशी यांनी एमआयडीसीमध्ये वीज जोडणी करण्याबाबतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली होती.


एमआयडीसीत उच्च क्षमतेचे विद्युत रोहित्र मंजूर झाले असून,वीज जोडणीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे.दरम्यान, विद्युत रोहित्र जोडणीमुळे गुजरातचे उद्योग महाराष्ट्रात अर्थातच नवापूर एमआयडीसीत येतील. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्न सुटणार आहे.

Post a Comment

0 Comments