Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

'जन्मभूमी ते कर्मभूमी' पुस्तकाचे प्रकाशन: गजमल पवारांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव

 सहसंपादक अनिल बोराडे 

मावजीपाडा, ता. साक्री, जि. धुळे: साक्री तालुक्यातील मावजीपाडा येथील भूमीपुत्र आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे सेवानिवृत्त उपकुलसचिव गजमल पवार यांच्या 'जन्मभूमी ते कर्मभूमी' या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल, १४ जून रोजी मोठ्या उत्साहात मावजीपाडा येथे पार पडला. एका आदिवासी पाड्यावर शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन, अनेक संघर्षांवर मात करत विद्यापीठाच्या अधिकारी पदापर्यंत पोहोचण्याचा गजमल पवारांचा प्रवास प्रेरणादायी असून, या पुस्तकातून त्यांच्या जीवनातील खडतर वाटचालीचे दर्शन घडते.



याप्रसंगी जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी गजमल पवारांच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, "एका आदिवासी पाड्यावर शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन मोठ्या संघर्षाने शिक्षण पूर्ण करून विद्यापीठाच्या अधिकारी पदापर्यंत पोहोचणे ही बाब कौतुकास्पद आहे. अनेक वर्षे समाजकल्याण विभागात समाजाची सेवा केल्यानंतर, विद्यापीठात विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची सेवा करण्यात धन्यता मानणारे जी. एन. पवार यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे."

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्रीच्या आमदार सौ. मंजुळाताई गावित होत्या. 'जन्मभूमी ते कर्मभूमी' या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री चैत्राम भाऊ पवार (बारीपाडा, तालुका साक्री) यांच्या हस्ते करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये डॉ. विनोद पाटील (कुलसचिव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), बापूसाहेब चौरे (माजी खासदार), प्रा. डॉ. मधुकरराव उईके (अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, नागपूर), यशवंतराव पवार (माजी उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क तसेच अध्यक्ष, आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान, नंदुरबार), यशवंत मलये (राज्याध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, मुंबई), माजी प्राचार्य डॉ. डी.एल. तोरवणे (साक्री), प्राचार्य एस.एन. भारंबे (मु.जे. महाविद्यालय, जळगाव), प्राचार्य आर.आर. अहिरे (सि.गो. पाटील महाविद्यालय, साक्री), वसंतराव पवार (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, साक्री), सौ. लताबाई वसंत पवार (माजी जिल्हा परिषद सदस्य, धुळे), प्रा. डॉ. एस.टी. भुकन (अधिष्ठाता, जळगाव), प्रा. डॉ. सचिन नांद्रे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), प्राचार्य चेतन मसराम (केंद्रीय संघटक, नागपूर), दयाराम देवचंद भोये (ज्येष्ठ नागरिक, कोकणगाव), विश्वास बागुल (माजी जिल्हा परिषद सदस्य, धुळे), वासुदेव गांगुर्डे (संस्थापक अध्यक्ष, डोंगर-या माऊली संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, नंदुरबार), प्रा. डॉ. शिवाजी पाटील (व्यवस्थापन परिषद सदस्य, कबचौ उमवि, जळगाव), आणि प्राचार्य एस.आर. पाटील (नगाव) यांचा समावेश होता.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिभाताई चौरे देशमुख आणि ईश्वर ठाकरे सर यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ गायकवाड (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक व उपाध्यक्ष, आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान, नंदुरबार), रोहिदास गायकवाड (आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान, नंदुरबार), देवा पवार (केंद्रीय महासचिव, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, नागपूर), श्रीकांत मालवी (नागपूर), मोतीलाल वसंत पवार (मावजीपाडा), खुशाल नथू पवार (सरपंच, ग्रामपंचायत मावजीपाडा), लाला काळू ठाकरे (ज्येष्ठ नागरिक), भरत सोनू पवार (ग्रामस्थ), मावजीपाडा येथील ग्रामस्थ मंडळी, आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान (धुळे, नंदुरबार, नाशिक), ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन (नागपूर, मुंबई) तसेच गजमल पवार यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक यांनी विशेष सहकार्य केले.

गजमल पवारांचे हे आत्मचरित्र केवळ त्यांच्या व्यक्तिगत संघर्षाची गाथा नसून, ते आदिवासी समाजातील अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments