सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. आज जाहीर झालेल्या निकालामध्ये विद्यालयाचा निकाल ९२.३०% लागला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या एस.एस.सी. परीक्षेमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. सेमी इंग्रजी माध्यमामध्ये कुमार नवनीत रविंद्र पगारे याने ८८.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर कुमारी आश्विनी भुऱ्या अहिरे (८७.००%) द्वितीय आणि कुमारी स्नेहल दिनकर बिलकुले (८६.८०%) तृतीय आली.
मराठी माध्यमामध्ये कुमारी मारिया विलास मावची (८३.४०%) हिने प्रथम, कुमारी निकीता वनक्या गायकवाड (८३.२०%) हिने द्वितीय आणि कुमारी निकीता एकनाथ बहिरम (८२.२०%) हिने तृतीय क्रमांक मिळवला.
या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब सुरेंद्रराव विनायकराव मराठे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्या श्रीमती एस.एस.पवार, पर्यवेक्षक डी.पी. कुवर सर, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक जे.एन. मराठे सर, वर्गशिक्षक श्री. महेश मराठे सर व मयूर भदाणे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विशेष बाब म्हणजे, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील बोर्डाच्या परीक्षा प्रशासनाच्या आदेशानुसार कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्या. प्रत्येक परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच बाहेरील शाळांमधील पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शासकीय यंत्रणेच्या देखरेखेखाली सुरळीतपणे पार पडली.
पिंपळनेरसारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमाचा योग्य अभ्यास केला आणि उत्तरपत्रिका लेखनाचा सराव केला. शिक्षकांनी केलेल्या योग्य समुपदेशनामुळे आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ते निर्भयपणे परीक्षेस सामोरे गेले. याच प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले, त्याबद्दल त्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments