संपादकीय
नवापूर: नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. यावर्षी शाळेचा निकाल ९२.५२ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक परंपरेची पताका फडकत राहिली आहे.
या परीक्षेत पुष्कर गोविंदा कोळी याने ९२.२० टक्के (४५६ गुण) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गटात अंकिता मुकंदर गावित हिने ८९ टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. आदिवासी गटात प्रशाली सुरेश गावित ९०.२० टक्के (४५१ गुण) मिळवून प्रथम आली आहे.
इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मित्तल अजय बिऱ्हाडे आणि दीक्षा संदीप पाटील यांनी प्रत्येकी ९१.४० टक्के (४४७ गुण) मिळवून द्वितीय क्रमांक विभागून घेतला आहे. गायत्री योगराज सोनार ९०.६० टक्के (४५३ गुण) मिळवून तृतीय, तर वैशाली गणेश वसावे ८९ टक्के गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिली आहे.
या शानदार यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी, उपमुख्याध्यापक ए.एन. सोनवणे, उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी, पर्यवेक्षक हरीश पाटील, जी.डी. सुरवंशी आणि जगदीश वाघ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे मुख्याध्यापिका कोकणी यांनी सांगितले. या निकालामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Post a Comment
0 Comments