सहसंपादक अनिल बोराडे
धुळे प्रतिनिधी-पर्यावरण अभ्यास केंद्र बारीपाडा ता. साक्री येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी धुळे विभाग आयोजित दिनांक 20, 21 व 22 मे या दरम्यान चला निसर्गाच्या सानिध्यात उन्हाळी सुट्टी शिबीर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन पद्मश्री श्री चैत्राम पवार, अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री वरुणराज नन्नवरे, अभाविप धुळे जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. हेमंत जोशी, शिबिर प्रमूख चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी पद्मश्री श्री चैत्राम पवार यांनी म्हणाले की, कास म्हणजे नक्की काय तर शुद्ध व सात्विक आहार मिळणे म्हणजे विकास आहे. आज विद्यार्थी व्यसनाधिनतेकडे जात आहे. हे रोखण्यासाठी अभाविप अशा शिबिराचे आयोजन नेहमी करत असते. वरुणराज नन्नवरे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवी मांडणी करत असताना गेली 76 वर्षापासून अभाविप शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगितले. या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जंगलभ्रमंती, वादविवाद स्पर्धा, भाषण सत्र, चर्चा सत्र, ग्रामीण खेळ, जनजाती जीवन अनुभव असे विविध सत्रात सहभागी होऊन नैसर्गिक वातावरण व स्वतःच्या ज्ञानामध्ये भर घालण्याचे काम केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व आजचा शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी या विषयावर प्रा डॉ. हेमंत जोशी यांनी विद्यार्थ्यांना चर्चा केली. ऑपरेशन सिंदूर या विषयावर प्रा. बाजीराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर सोशल मीडिया योग्य की अयोग्य या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. ग्रामीण खेळ व जनजाती जीवन अनुभव या बारीपाडा गावामध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवला. या शिबिराचे समारोप अभाविप नंदूरबार जिल्हा विद्यार्थी विस्तारक व धुळे जिल्हा संपर्क मंगेश ढगे यांनी केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत पाटील, चेतन पाटील, हर्षल सरक, दीपक सरक, रमेश सरक, हर्षल शिरसाठ यांनी मेहनत घेतले.
Post a Comment
0 Comments