Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धुळे एसीबीची धडक कारवाई; बळसाणेच्या पोलीस पाटलाला लाच घेताना बेड्या

सहसंपादक अनिल बोराडे 


धुळे, दि. ७: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. साक्री तालुक्यातील बळसाणे येथील पोलीस पाटील आनंदा भटा पाटील (वय ३६) यांना एका तक्रारदाराकडून ₹ २,०००/- लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई काल, दि. ६ मे २०२५ रोजी करण्यात आली.


तक्रारदार यांच्या पत्नीने निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या बदल्यात पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी ₹ १०,०००/- लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ₹ ८,०००/- देण्याचे ठरले होते. यासंदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करत सापळा रचला. या सापळ्यात पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून ₹ २,०००/- स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

आरोपी पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया निजामपूर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री. सचिन साळुंखे आणि पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या पथकाने केली. ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे यांनी

Post a Comment

0 Comments