Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्रा. डॉ. सतीश मस्के 'काकासाहेब बैसाणे जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित

 सहसंपादक अनिल बोराडे 

शिरपूर, जि. धुळे, १६ मे २०२५: पिंपळनेर येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. सतीश मस्के यांना साहित्य व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठित 'काकासाहेब बैसाणे जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.



शिरपूर येथील हॉटेल सिटी प्राईड उत्सवच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा आ. आशाताई रंधे आणि संस्थेचे सचिव निशांतजी रंधे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर काकासाहेब बैसाणे यांच्या पत्नी आ. आशाताई बैसाणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधव कदम, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी जी.के. मंगळे, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी, आयोजक डॉ. तुषार बैसाणे, संदीप बैसाणे, पनीराज बैसाणे आणि डॉ. दिपाली सोसे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम काकासाहेब खंडू कडू बैसाणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत पार पडला.


प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी यापूर्वी शिक्षण, समाज आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पाच वेळा राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे 'खान्देशातील आंबेडकरी चळवळ' (खंड १, २, ३), 'आंबेडकरी योद्धा' (गौरवग्रंथ), 'हंबरडा' (कथासंग्रह), 'दाटून आलेल्या कळा' (कवितासंग्रह) आणि 'माणुसकीचा गहिवर' (ललित लेखसंग्रह) असे एकूण सात ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यासोबतच त्यांनी विविध साहित्य संमेलनांच्या परिसंवादात, चर्चासत्रात आणि कवी संमेलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.


या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पवार आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून प्रा. डॉ. सतीश मस्के यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.



या गौरवशाली सोहळ्याच्या वेळी प्रा. डॉ. सतीश मस्के यांना काकासाहेब बैसाणे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आ. आशाताई रंधे, संस्थेचे सचिव निशांत रंधे, आ. आशाताई बैसाणे, डॉ. माधव कदम आणि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी जी.के. मंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments