Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

23 वर्षांची शिक्षिका 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळाली, म्हणाली पोटात त्याचेच बाळ; पोलीसही हैराण

 संपादकीय 

दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता शिक्षिका पाच महिन्यांची असल्याचे कळाले. हे मूल आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचेच असल्याचा दावा शिक्षिकेने केला आहे. पोलीस आता डीएनए चाचणी करणार आहेत.



काही दिवसांपूर्वी शिक्षिका विद्यार्थ्याला सोबत घेऊन पळून गेली. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेवर मुलाचं अपहरण झाल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करत दोघांचा शोध सुरू केला. अखेर गुरुवारी शिक्षिका आणि विद्यार्थ्याला अरावली जिल्ह्यातील गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली. यानंतर दोघांनाही सुरतला आणले.


पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता ती विद्यार्थ्यासोबत सुरतहून अहमदाबादला गेली. मग अहमदाबादहून ते दिल्ली, वृंदावन आणि जयपूरला गेल्याचे सांगितले. जयपूरहून परतत असताना, पोलिसांनी दोघांनाही शामलाजी सीमेवर पकडले. तपासादरम्यान, पोलिसांना कळले की महिला शिक्षिका गर्भवती आहे. पोलिसांनी महिला शिक्षिकेला पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल विचारले तेव्हा महिलेने सांगितले की ते मूल अल्पवयीन विद्यार्थ्याचेच आहे.


हे ऐकताच पोलीस हैराण झाले. महिला शिक्षिकेच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला वडिलांच्या ताब्यात दिले, तर महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments