संपादकीय
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए.एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विज्ञान विभागाचा निकाल 97.87% टक्के लागला. यात विज्ञान शाखेत प्रथम - तनया प्रवीण साळुंखे 80.67% गुण मिळवून शाळेत उज्ज्वल यश संपादन केले, तर द्वितीय - मोहीत प्रवीण ब्रम्हे, तृतीय - कु जान्हवी पराग पुराणिक 77.50% गुण प्राप्त करून शालेय गुणवत्ता यादीत यश मिळवले.
यंदा कला शाखेचा निकाल 56.46% लागला. यात प्रथम क्रमांक कु मकरानी नर्गिस 80.83% गुण प्राप्त करून मिळविला आहे तर द्वितीय क्रमांक कु अस्मिता गावीत 72.00.% तृतीय क्रमांक चि अजय गावीत याने 69.67% गुण प्राप्त करून यश संपादन केले. आदिवासी गटातून अस्मिता गावीत या विद्यार्थिनीने 72. 00% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
यावर्षी शाळेचा एकूण निकाल 72.61% लागला असून शाळेने या वर्षीही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत उत्तम यश मिळवले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विपीनभाई चोखावाला, कार्याध्यक्षा शितलबेन वाणी, उपाध्यक्ष शिरिषभाई शहा, सचिव राजेंद्रभाई अग्रवाल, सहसचिव शोएब भाई मांदा, कोषाध्यक्ष सतिषभाई शहा, सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.
प्राचार्य मिलिंद वाघ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या मेहनतीचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे तसेच पालकांच्या सहकार्याचे कौतुक केले. "विद्यार्थ्यांचे हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे," असे त्यांनी सांगितले. प्रसंगी उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख मेघा पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments