संपादकीय
गावपातळीवर शासकीय सेवा, मार्गदर्शन आणि त्वरित कार्यवाहीचा निर्धार!
तहसील कार्यालय, नवापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविले जात असून, 17 एप्रिल 2025 पासून नवापूर तालुक्यातील विविध मंडळांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या महसूल सेवा व योजना थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या अभियानात मिळणार –
* उत्पन्न, जात, रहिवासी, मृत्यू प्रमाणपत्र व इतर दाखले
* नवीन आधार / अन्न सुरक्षा सूची नोंदणी
* विविध सामाजिक लाभ योजनांचे मार्गदर्शन
* Agri-stack अंतर्गत शेतकरी नोंदणी
* शेतजमिनीचे फेरफार, खातेफोड, 7/12 उतारा अद्ययावत करणे
* शिधापत्रिका, ई-सेवा केंद्रांमार्फत विविध सेवा
* स्थानिक समस्या व मागण्यांवर अधिकाऱ्यांचे थेट उत्तर
आपल्या गावातच मिळणार सर्व सेवा – एकाच छताखाली!
प्रत्येक केंद्रावर संबंधित अधिकारी, महसूल कर्मचारी, मंडळ अधिकारी व महा ई-सेवा केंद्र चालक उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेऊन आपली कामे सोडवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.
संयोजन : तहसील कार्यालय, नवापूर
Post a Comment
0 Comments