सहसंपादक अनिल बोराडे
"मराठी विश्वकोशाचे लेखनकार्य करताना लेखकांनी विषयाच्या संदर्भात सर्वांगीण चिंतन करणे गरजेचे आहे", असे प्रतिपादन सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा विषयाच्या मराठी विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळेत प्रमुख वक्ते डॉ. सतीश पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ रोजी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे नोंदलेखन कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला श्री. विवेकानंद कदम, माजी समन्वयक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पालघर, यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले. यावेळी कर्नल कपिल जोध, कुलसचिव, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे आणि डॉ. राजकुमार राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर श्री. आनंद गेडाम, विद्याव्यासंगी सहायक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी पी.पी.टी.च्या माध्यमातून मराठी विश्वकोशाचे नोंदलेखन, समीक्षण करताना संबंधितांनी काय काय काळजी घेतली पाहिजे, विश्वकोश पद्धतीशास्त्राप्रमाणे, आराखड्यानुसार नोंदलेखन कसे केले पाहिजे इत्यादीसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसनही केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रचना परदेशी यांनी केले. यावेळी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था येथील अधिकारी-कर्मचारी व सुमारे राज्य भरातून नमस्कार लेखक कार्यशाळेला उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments