नंदुरबार – सण, उत्सवाच्या नावाखाली कोणतीही खाजगी व्यक्ती, संस्था, गट किंवा संघटना व्यापारी तसेच नागरिकांकडून जबरदस्तीने, दमदाटी करून किंवा अन्य कोणत्याही बेकायदेशीर माध्यमातून वर्गणी वसूल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर संबंधितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच गुन्ह्यात सामील सर्व साथीदारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी दिला आहे.
पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, कोणीही जबरदस्तीने वर्गणी वसूल करीत असल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी किंवा बळजबरी सहन केली जाणार नाही. याबाबत नागरिकांनी जागरूक राहावे आणि अशा प्रकारांबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments