सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर-- पिंपळनेर तालुका पत्रकार संघातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पिंपळनेर शहरातील व परिसरातील सतत कष्ट व संघर्षातून यशोशिखरावर गाठणाऱ्या
महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या तसेच काबाडकष्ट करून आपल्या परिवाराला एका उंचीवर नेणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिक महिला
दिनाच्या निमित्ताने पिंपळनेर तालुका पत्रकार संघातर्फे नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
हा कार्यक्रम राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष पिंपळनेर रत्न पुरस्कार प्राप्त सुरेंद्रराव विनायकराव मराठे हे होते यावेळी सौ पुष्परलता शांताराम पाटील यांनी त्यांच्या दिव्यांग मुलाचा 34 वर्षापासून सांभाळ संगोपन करीत असून परिवाराला भक्कमपणे साथ दिली मुलगा दिव्यांग असूनही त्याचे सर्व लाडकोड करत त्याला कसली उणीव भासू न देता त्याची अविरत सर्वसेवा करणारी आई म्हणून त्यांचा "आदर्श मातापुरस्कार म्हणून सन्मान करत पुरस्कार देण्यात आला ,दुसऱ्या आदर्श माता देशशिरवाडे येथील सौ हिराबाई विष्णू सोनवणे यांचे पती दोन्ही डोळ्यांनी अंध असून मुलगा सुद्धा अंध आहे अशाही परिस्थितीत त्यांनी हात मजुरी, काबाडकष्ट करत आपल्या दोन मुलींची लग्न केली आणि मुलास पदवीपर्यंतचे शिक्षण देत बॅंकींगची स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले मुंबई पर्यंत उपाशी तपाशी घेऊन जात त्याचे फलित आज त्यांचा मुलगा सेंट्रल बँक ऑफ इंडिया पिंपळनेर शाखेत लिपिक पदावर कार्यरत झाला आहे. अशा आदर्श मातेला ही पिंपळनेर पत्रकार संघातर्फे आदर्श माता पुरस्कार देण्यात आला, तिसरी आदर्श माता सौ सविता फत्तेसिंग राजपूत यांचे पती रिक्षा चालक असूनही आपल्या गावाकडील नऊ पुतण्या ,पुतणी,व घरचे मुलांना पण
यांना त्यांनी पिंपळनेर येथे काबाडकष्ट करून त्यांना शिक्षण दिले व ते विद्यार्थी नवोदय परीक्षा उत्तीर्ण होऊन आज चांगले शिक्षण घेत आहेत त्यांनाही आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. चौथा क्रमांक पुरस्कार संगीता शांताराम रायते यांना त्या दिव्यांग असूनही आपल्या परिवाराचा भक्कम आधार असून प्राथमिक शिक्षिकेच्या रूपाने त्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अनेक विद्यार्थी घडवले, कुटुंबासोबतच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना आदर्श,पुरस्कार देण्यात आला ,पाचवा पुरस्कार सौ छायाबाई संजय वाडेकर यांना देण्यात आला असून त्यांनी सतत धडपड करीत,अतिशय गरिबीतून आपल्या ३ मुलींची लग्न केली, मुलाचे शिक्षण केले व आपला परिवार सांभाळत आहे त्या महिला बचत गटाच्या प्रमुख असुन अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सुतार लोहार समाज महिला संघटना अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचाही आदर्शमाता,पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले तसेच राजे छत्रपती इंग्लिश मीडियम च्या प्राचार्य श्रीमती सोनाली पाटील मॅडम यांनी अतिशय उत्कृष्टपणे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत शाळेचा विविध अंगी विकास केला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांच्या प्रयत्नाने उत्कृष्टपणे कार्य करत असून त्यांनी आपल्या मुलीला ओबीसी ची (कास्ट) व्हॅलिडीटी मिळावी तीही आईच्या नावावर आणि म्हणून त्यांनी कोर्ट, कचेरी करत लढा उभारला आणि महाराष्ट्रातील असे एकमेव उदाहरण झाले की आईची जात मुलीसाठी ग्राह्य धरण्यात आली म्हणून त्यांचाही आदर्श माता शिक्षिका पुरस्कार देऊन यांचा गौरव करण्यात आला ,सहावा पुरस्कार पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर सामोडे येथील शिक्षिका सामाजिक कार्यकर्त्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांमधील कार्य शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य करूनही आपल्या मुलीला अधिकारी पदापर्यंत पोहोचवले मुलाला इंजिनियर केले अशा श्रीमती मनीषा नरहर भदाणे यांना आदर्श माता, शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रा. शिवप्रसाद शेवाळे यांनी केले तर प्रास्ताविक पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी केले तर आभार सचिव विशाल गांगुर्डे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. एस डी पाटील, भिलाजी जिरे,अंबादास बेनुस्कर, चंद्रकांत घरटे,अनिल बोराडे ,दिलीप बोळे,भरत बागुल,विशाल बेनुस्कर आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments