Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मधमाश्यांचा हल्यात शाळकरी विद्यार्थी जखमी

 सहसंपादक अनिल बोराडे 

साक्री शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने या घटनेत 20 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. मात्र, शिवसेना तालुकाप्रमुख, नगरसेवक पंकज मराठे, सामाजीक कार्यकर्ते गुड्डू पठाण, यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.


 त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत न घाबरता मदत कार्य सुरू केले. मधमाशांच्या तावडीतून विद्याथ्यांची सुटका करीत त्यांना शासकीय रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल केले

शाळेच्या आवारातील निंबाच्या झाडावर आणि शाळेच्या खिडक्यांवर देखील मोठं मोठी मधमाश्यांची पोळी असुन आज सकाळी १०.३० च्या सुमारास शाळा भरतेवेळी मधमाशांनी थेट विद्यार्थ्यांसह त्यांना घेण्यासाठी आलेल्या पालकांवरही हल्ला चढवला. मधमाशांनी वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना

चेहऱ्यासह अंगावर चावा घेतला. या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये घबराट पसरल्याने. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी  आक्रोश सुरु केला. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक पंकज मराठे आणि कार्यकर्ते गुड्डू पठाण यांनी तात्काळ शाळेत धाव घेतली. तेव्हा काही विद्यार्थ्यांच्या चेहन्यावर आणि संपूर्ण डोक्यावर मधमाशा चिटकलेल्या होत्या, त्या हलवता येता नव्हत्या. पंकज मराठे यांनी न घाबरता तातडीने विद्याथ्यांना उचलून खाजगी वाहनाने सर्विस सेंटरवर नेले. तेथे

विद्यार्थ्यांच्या अंगावरून पाण्याच्या साहाय्याने मधमाशा दूर केल्या आणि लगेचच रुग्णवाहिकेद्वारे साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. साक्री ग्रामीण रुग्णालयातील डॉ. कन्हैया अहिरराव, डॉ. हिना साहू आणि डॉ. श्रीकांत पाटील यांनी विद्याथ्र्यांवर तातडीने उपचार केले. काही विद्यार्थ्यांच्या नाका-कानात मधमाशा घुसल्या होत्या, त्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

राजवी गौतम बच्छाव, दूर्वा भावसार, सानवी निशांत जाधव,

वेदांत भाऊसाहेब पवार, मानव हेमराज ब्राह्मणे, हर्षाली आदेश कुवर, तनिष्का ज्ञानेश्वर सूर्यवंशी, खुशाल हेमंत कुवर, डिंपल उमेश कुवर, रुद्र सचिन शिंगाणे प्रज्ञश्री दिनेश ठाकरे, लोकेश जगदीश गांगुर्डे, भाविका प्रशांत शिंदे, मितेश खुशाल खैरनार, तनिष्का सचिन ठाकरे, चैतन्या संदीप ठाकरे, खुशाल दीपक शिंदे, पियुष मनोज बच्छाव, सुमित प्रमोद बोरसे, जयेश सचिन शिंगावे अशी मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाल्या विद्याथ्र्यांची नावे आहेत.

या मदत कार्यात गुड्डू पठाण यांनाही मधमाशांनी चावा घेतला, मात्र त्यांनी कोणतीही तक्रार न करता विद्याथ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले. शाळेच्या आवारात मधमाशांची पोळी असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. कालपासूनच मधमाशा शाळेत फिरत होत्या. काल देखील शाळेजवळील विक्रेत्यांसह काही नागरिक मधमाशांनी चावा घेतल्याने जखमी झाले होते. मात्र तरीही शाळा प्रशासनाने कुठलीही खबरदारी न घेतल्यामुळे पालकांनी

घटनेची

दखल घेऊन तत्काळ मधमाशांची पोळी हटवण्याची मागणी पालकांनी केली आहे..

आधी पोळे हटवा, मगच शाळा भरवा आमच्या शाळेजवळ काम सुरू असताना, एका व्यक्तीने शाळेच्या लहान मुलांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती दिली. हे ऐकताच मी आणि गुड्डू पठाण मदतीसाठी तत्काळ धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर चिमुकल्या विद्यार्थ्यांना मधमाशांनी घेरलेले दिसले. शिक्षकदेखील त्यांना वाचवण्यासाठी धडपडत होते. परिस्थिती अत्यंत भयंकर होती. आम्ही त्वरित मुलांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यानंतर खाजगी वाहनाने त्यांना सर्विस स्टेशनवर नेऊन पाण्याच्या साहाय्याने शरीराला चिकटलेल्या मधमाशा काढल्या. प्राथमिक मदत दिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर शाळेने आधी मधमाशांचे पोळे हटवावे आणि त्यानंतरच शाळा भरवावी, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख पंकज मराठे यांनी केली.


Post a Comment

0 Comments