जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी=रसीक गावीत
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, नंदुरबार बांची तात्काळ उचलबांगडी करण्यासाठी महाराष्ट्र आदिवासी डाक्टर असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनाचा आशय असा, माडा ही एक सामाजिक संघटना असून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जनतेच्या चांगल्या, दर्जेदार, अविरत रुग्णसेवा मिळवुन देणेसाठी कटीबद्ध आहे, त्याअनुषंगाने माडा ही नेहमी जनतेच्या हितासाठी काम करीत आहे व काम करीत राहील.
त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ल्यातील आरोग्यसेवा दर्जेदार राहणे, गुणवत्तापूर्वक राहणे, सातत्य ठेवणे हे क्रमप्राप्त आहे, ह्यासाठी आरोग्यातील सर्व विभागप्रमुख ह्यांची प्राथमिक जबाबदारी असते व ती त्यांनी पार पाडणे करीत आहे व काम करीत राहील,
परंतु मागील पंधरा दिवसापासून जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाते बचिबाबत विविध संघटनानी व प्रसार माध्यमांनी त्यांच्याविषयी अनेक गंभीर तक्रारी केल्या असून, त्यात तथ्य असण्याची दाट शक्यता आहे.
सदर तक्रारींमध्ये त्यांच्याकडून रुग्णसेवा देणे, अधिकारी, डॉक्टर्स, रुग्णालयातील स्टॉफ तसेच बाकी वर्ग यांचेकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरितीने आर्थिक पिळवणुक होत असल्याचे दिसून येत आहे, तसेच त्याच्याबाबत मनमानी कारभार करणे, हीन दर्ज्यांची वागणूक देणे इत्यादी गंभीर स्वरुपाच्या तक्रारी होत आहेत.
महोदय, यामध्ये बहुसंख्य माडा सदस्य असून रुग्णालयात सेवा देणारे आदिवासी बहुल कर्मचारी असून त्यांच्यावर हा एक मोठा अन्याय होत आहे.
माडा संघटना या निवेदनाद्वारे आपणास विचारणा करते की, नंदुरबार जिल्ह्यातील तदर्थ वैद्यकीय अधिकारी तसेच एन. एच. एम. मधील कंत्राटी भरती जिल्हा कमिटीला विचारात न घेता व परस्पर आर्थिक व्यवहार झाल्याचे कळाले आहे, सदर माहिती प्रत्यक्षात झाली ली असेल तर ही बाब खरोखर गंभीर आहे, करीता जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर झालेल्या आरोपांवर अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही का करण्यात आली नाही व याबाबत शासना कार्यवाही करण्यात येत आहे याची माहिती मिळावी सदर जिल्हा शल्यचिकित्सक वर्षा लहाडे या स्वतः व त्यांचे हस्तकांमार्फत ज्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत त्यांना धाक दाखवुन तक्रारी माघार घेण्यासाठी धमकी दिल्या जात असल्याच्या तक्रारी संघटनेस प्राप्त झाल्या आहेत. सदरचा प्रकार हा गंभीर आहे सर्व तक्रारदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे वर्षा लहाडे यांना त्या जागी राहु देणे अत्यंत धोकेदायक आहे. तसेच अशा धोकेदायक
वातावरणात रुग्णसेवा देणे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अत्यंत धोकेदायक आहे. करीता सर्व नंदुरबार जिल्हयातील आदिवासी बहुल जनतेला योग्य सेवा, दर्जेदार सेवा, गुणवत्तापूर्वक सेवा ही मिळणेसाठी सर्व रूग्णालयीन कर्मचा-यांचे स्वास्थ चांगले व सुरक्षित भावना असणे आवश्यक आहे.
तरी महोदयांना, या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. वर्षा लहाडे यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी. जर डॉ. वर्षा लहाडे यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली नाही तर नाईलाजास्तव माडा संघटना प्रचंड आंदोलन करेल.त्यामुळे आदिवासी जनता रुग्ण सेवेपासून वंचित झाल्यास व जिल्ह्याची रुग्णसेवा कोलमडल्यास त्यास पूर्णतः स्थानिक प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.
निवेदनावर डॉ. राजेश वळवी अध्यक्ष आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन, प्रकाश ठाकरे यांच्या सह्या आहेत.
Post a Comment
0 Comments