संपादक=अशोक साठे
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात कृषी विभागाचा अभिनव उपक्रम; स्थलांतर आणि कुपोषणावर मात करण्यासाठी आदिवासी महिलांचा पुढाकार!स्थलांतर आणि कुपोषण यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात आता महिलांसाठी एक नवा आशेचा किरण दिसला आहे. कृषी विभागाने नवापूर तालुक्यातील आदिवासी महिलांना मशरूम उत्पादनाचे विशेष प्रशिक्षण दिले असून, त्यामुळे त्या आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. घरबसल्या उत्पादन आणि हातोहात विक्री!बोकळझर गावातील २५ महिलांनी मशरूम शेती सुरू केली!घरातील रिकाम्या जागेचा उपयोग करून सुरू झाला व्यवसाय!३०० रुपयांत बियाणे आणि प्रतिकिलो मशरूमला १२०० ते १५०० रुपयांचा दर!
गुजरातच्या सुरतसारख्या मोठ्या बाजारपेठेमुळे विक्री सहज उपलब्ध!बोकळझर गावातील मशरूम उत्पादक सौ. सुमन गावित म्हणतात, “पूर्वी गावात रोजगार मिळत नव्हता, त्यामुळे स्थलांतराशिवाय पर्याय नव्हता. मात्र कृषी विभागाच्या मशरूम प्रशिक्षणामुळे आता आम्ही घरबसल्या चांगला व्यवसाय करू शकतो. सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आम्हाला चांगला भाव मिळतो!”स्थलांतर थांबवण्यासाठी आणि महिला सशक्तीकरणासाठी प्रभावी उपाय!मशरूम शेतीसाठी विशेष जागेची आवश्यकता नसते!
शेतातील पाला-पाचोळ्याचा उपयोग करून सहज उत्पादन घेता येते!कमी खर्चात मोठा नफा मिळणारा व्यवसाय असल्याने महिलांसाठी सुवर्णसंधी तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी म्हणतात, “नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतर थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभाग विविध योजना राबवत आहे. मशरूम शेती हा त्याचाच एक भाग आहे. भविष्यात आणखी १०० आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन मशरूम उत्पादन वाढवले जाणार आहे. एवढेच नव्हे, तर औषध कंपन्यांसोबत करार करून या मशरूमची विक्री केली जाणार आहे.” नवापूर तालुका ‘मशरूम हब’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे!कृषी विभागाच्या पुढाकारामुळे आदिवासी महिलांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात नवापूर तालुका ‘मशरूम हब’ म्हणून विकसित होईल आणि इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल!हा उपक्रम केवळ महिलांना आर्थिक स्वावलंबनच देत नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धी आणि कुपोषणमुक्त समाज निर्माण करण्यास मदत करत आहे.मशरूम शेतीने महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा मार्ग खुला केला आहे. आता स्थलांतर नव्हे, तर गावातच समृद्धी मिळवण्याचा संकल्प! या यशस्वी उपक्रमाने महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले असून, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठ
रणार आहे!
Post a Comment
0 Comments