संपादक=अशोक साठे
सविस्तर वृत्त असे की नवापूर नगरपरिषद हद्दीतील रहिवासी व नागरिक आपणाकडे नश्न निवेदन सादर करीतो की, मागील अनेक वर्षांपासून शहरात आग लाण्याच्या घटना घडलेल्या असून त्यात वृध्दी झालेली आहे. नगरपरिषदेकडे एक अग्निशमन वाहन असून ते पुरेसे नाही. त्यामुळे आग लागल्याची घटना झाल्यास आग विझवणे शक्य होत नाही. तसेच सदर वाहनाचे पाणी संपल्यास पुन्हा त्याच वाहनात पाणी भरुन सदर घटनेच्या ठिकाणी येण्यास वेळ लागतो आणि एकच अग्निशमन वाहन असल्यामुळे आग अटोक्यात न आल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शहरात नागरिकांची संख्या वाढल्याने घरांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी लहान-मोठ्या वस्त्या, दाट वस्त्या निर्माण झालेल्या आहेत. काही ठिकाणी घरे हे सोबतच असल्याने, एकाला लागून एक घर सलग असल्याने अशा ठिकाणी आग लागल्यास मोठ्या प्रमाणात आगीचा तांडव तयार होतो यात घरासोबत संसारोपयोगी साहित्याचे देखील नुकसान होते व या आगीत सर्वच जळून खाक होते. दुर्दैवाने झालेल्या नैसर्गिक घटनेस जबाबदार कोणी नसते पण असे झाल्यास योग्य ती यंत्रणा राहिल्यास मोठी घटना होण्यापुर्वीच नियंत्रण मिळवू शकतो म्हणून एक अग्निशमन वाहनाची शहरात अत्यंत आवश्यकता आहे.
तसेच नवापूर नगरपरिषदेकडे रुग्णवाहिका (Ambulance) व शववाहिनीची देखील अत्यंत आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने हा विषय अतिशय संवेदनशील आहे. रुग्णवाहिका व शववाहिनी हे नवापूर नगरपरिषदेकडे नसून ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महोदय नवापूर शहरात व सध्याचे वातावरण पाहता रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे व रुग्णवाहिका नसल्याने रुग्णास आवश्यक त्या इस्पितळात घेऊन जाणे जिकरीचे होत असते व या असुविधेमुळे अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार यांनी नंदुरबार जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी यांच्याकडे केली आहे
Post a Comment
0 Comments