सहसंपादक=अनिल बोराडे
निमगुळ (ता.शहादा)येथील कै .गं. भा. वत्सलाबाई शिवदास बागल हल्ली मुक्काम सामोडे यांचं वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धप काळाने दिनांक १/२/ २०२५रोजी निधन झाले त्यांना पाच मुली एक मुलगा असा त्यांचा परिवार होता त्यांच्या पतीचे सन १९८९ साली मृत्यू झाला तर १४ वर्षानंतर मुलाचेही सन २००३ रोजी आकस्मित मृत्यू झाल्याने त्याचा उदरनिर्वाहचा प्रश्न झाल्याने लग्न होऊन सासरी गेलेल्या पाचही मुलींवर ही आईची जबाबदारी आल्याने मुलींनीही ती प्रामाणिकपणे पार पडली. जवळपास २२ वर्ष या मुलींनी आपल्या आईची सेवा केली "अगं आई देवाने एक मुलगा मेला पण पाच मुली मुलासारख्या तुला दिल्यात "असं आपल्या आईला नेहमी सांगत होत्या व त्या आईही आपल्या मुलींकडे रममान होऊन जायच्या त्याचप्रमाणे त्यांचे पाचही जावई आपल्या आईसारखेच प्रेम देत असल्याने बावीस वर्षाच्या काळात त्यांचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं होतं त्या गेल्या काही दिवसापासून आपल्या नाशिक येथील मुलीकडे वास्तव्यात होत्या त्यांना अध्यात्माची गोडी होती. म्हणून त्या साक्री येथे पंडित प्रदीप शर्मा यांच्या शिवपुराण कथेसाठी सामोडे येथील मुलीकडे कथा ऐकण्यासाठी आल्या होत्या. वृद्ध अवस्थेतही साक्री येथे सात दिवस कथा ऐकण्यासाठी जात होत्या शनिवार रोजी पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाले ज्या आईने पाच मुली व एक मुलगा यांना जन्म घेऊन हे जग दाखवले व एकुलता एक मुलाचे निधन झाल्याने मुलाचे कर्तव्य पार पाडताना चारी बहिणींनी आपल्या आईला खांदा दिला तर एका मुलीने आपल्या आईला अग्नी डाग देत मुलाचे कर्तव्य पार पाडत मुलगा असो की मुलगी दोघेही सारखेच असतात असे दाखवून दिले. यावेळी त्यांचे पाचही जावई त्यांची मुलं सुना नातू यांनी त्या आईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
Post a Comment
0 Comments