सहसंपादक अनिल बोराडे
धुळे, दिनांक ०३/११/२०२६
धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत साक्रीरोडवरील कारखाना फाटा येथील हॉटेल दोस्तानाजवळ अवैध जुगार खेळणाऱ्यांवर साक्री पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १७,८०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका मुख्य आरोपीसह वाहनचालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई:
दिनांक ०२/११/२०२६ रोजी साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.ोंकार गवळी यांना एक गोपनीय माहिती मिळाली की, भांडणे शिवारातील कारखाना फाटा येथील हॉटेल दोस्तानाजवळील पत्र्याचे शेडमध्ये दिनेश राजेंद्र खैरनार (रा. मालपूर, ता. साक्री, जि. धुळे) हा काही इसमांना एकत्र जमवून ५२ पत्त्यांचा कॅटवर पैसे लावून 'मन्ना मांग' नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवत आहे. या माहितीच्या आधारे तात्काळ साक्री पोलीस ठाण्याच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
जुगार खेळणारे इसम वाहन सोडून पसार:
पोलिसांनी छापा टाकला असता, तिथे जुगार खेळणारे इसम आपली वाहने जागेवरच सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगारासाठी व वाहतुकीसाठी वापरलेली तब्बल ९ मोटर सायकली आणि २ चारचाकी वाहने असा एकूण १७,८०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जप्त केलेल्या मुद्दामाचा तपशील:
१. हुंडाई क्रेटा कार (क्र. MH-18/CL-5326) – किंमत रु. १०,००,०००/-
२. मारुती सुजुकी इको कार (क्र. MH-01/BF-7412) – किंमत रु. ३,००,०००/-
३. हिरो एच.एफ. डिलक्स मोटर सायकल (क्र. MH-18/BN-7857) – किंमत रु. ४०,०००/-
४. हिरो स्पलेंडर प्लस मोटर सायकल (क्र. MH-18/BJ-9347) – किंमत रु. ५०,०००/-
५. बजाज पल्सर मोटर सायकल (क्र. MH-41/AN-0143) – किंमत रु. ६०,०००/-
६. बजाज पल्सर मोटर सायकल (क्र. MH-18/CD-2495) – किंमत रु. ५०,०००/-
७. होंडा युनिकॉर्न मोटर सायकल (क्र. MH-18/CA-2315) – किंमत रु. ७०,०००/-
८. होंडा शाइन मोटर सायकल (क्र. MH-18/AS-4680) – किंमत रु. ५०,०००/-
९. हिरो एच.एफ. डिलक्स मोटर सायकल (क्र. MH-18/BU-9151) – किंमत रु. ५०,०००/-
१०. बजाज डिस्कवर मोटर सायकल (क्र. GJ-06/EP-6892) – किंमत रु. ४०,०००/-
११. सुजुकी एक्सेस स्कुटी (क्र. MH-18/CF-2214) – किंमत रु. ७०,०००/-
एकूण हस्तगत मुद्देमाल: १७,८०,०००/- रुपये
गुन्हा दाखल:
या प्रकरणी आरोपी दिनेश राजेंद्र खैरनार (वय-३६ वर्षे, रा. मालपूर, ता. साक्री, जि. धुळे) याच्यासह नमूद वाहनांच्या चालकांविरुद्ध व मालकांविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४९/२०२६ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक धुळे श्री. विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. ओंकार गवळी (प्रभारी अधिकारी, साक्री पोलीस ठाणे), पोउनि. अशोक बळवी आणि पोलीस अंमलदार संतोष मोर, हर्षल इसपर, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, प्रमोद पांचाळ, तुषार जाधव यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments