Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापुरात राष्ट्रवादी काँग्रेस व सुमाणिक परिवाराचे बॅनर फाडणाऱ्या विघ्नसंतोषींवर कारवाईची मागणी; पोलिसांत निवेदन

 नवापूर (विशेष प्रतिनिधी):

नवापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुमाणिक परिवाराच्या माध्यमातून लावले जाणारे फलक (बॅनर) काही विघ्नसंतोषी व विरोधकांकडून फाडले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भरतभाऊ माणिकरावजी गावित यांच्या वतीने नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध कार्यक्रम आणि सुमाणिक परिवाराकडून आयोजित उपक्रमांची माहिती शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मिळावी, या उद्देशाने नवापूर नगरपरिषद हद्दीत बॅनर लावले जातात. परंतु, काही अज्ञात विघ्नसंतोषी व्यक्ती व राजकीय विरोधक हे फलक जाणीवपूर्वक फाडून नुकसान करत आहेत.

या प्रकारामुळे परिसरात असंतोष पसरत असून, अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरात ज्या ठिकाणी हे बॅनर लावले आहेत, तेथील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करून दोषी व्यक्तींचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी नम्र विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत माहिती व पुढील योग्य कारवाईसाठी नवापूरचे तहसीलदार आणि नवापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनादेखील रवाना करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments