Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताहाचा शुभारंभ व परिसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

 नंदुरबार, दि. १३ जुलै २०२६ : लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने “सेवा सप्ताह” आयोजित करण्यात आला असून, त्याचा शुभारंभ काल नंदुरबार येथील इंदिरा मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.




कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री अनिल भाईदास पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते श्री भरत माणिकराव गावित होते.


कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०वा १०मि. वाजता पक्षध्वजारोहणाने झाली. त्यानंतर राष्ट्रगीत झाले आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर आयोजित परिसंवादात अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा व सर्वसामान्यांप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरवपूर्ण उल्लेख करत आपल्या भावना व्यक्त केल्या.



या परिसंवादात इंजि. जेलसिंग पावरा, श्री मोहन मा एमळी, श्री मोहन शेवाळे, डॉ. सुरेश नाईक, श्री राजेंद्र बावीस्कर, वाजिद सैय्यद, मकसुद खाटिक, श्री मधुकर पाटील, सौ. सीमा सोनगरे, कु. मालती वळवी, छोटु कुंवर, राजा ठाकरे, ॲड. दिनेश माळी, श्री युनूस पठाण आदी मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षाने जिल्ह्यात मिळवलेले यश पुढेही अधिक बळकट करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभा राहील.”


कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री अनिल भाईदास पाटील यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी, बूथ रचना, बूथ समित्यांचे सक्षमीकरण, बी.एल.ओ. समन्वय तसेच प्रत्येक बूथवर प्रभावी संघटन उभारणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरणही करण्यात आले.




कार्यक्रमास श्री योगेश चौधरी (तळोदा पॅनल प्रमुख)अमृतकर आप्पा, संजय जवरु पाडवी, संजय मुसळदे, सौ. संगीता पाडवी, श्री प्रकाश पवार, श्री संतोष पराडके, श्री सुरेंद्र कुवर, श्री मोंटू जैन, डॉ. योगेश पाटील, श्री के. बी. पाटील, श्री यशवंत ठाकरे, श्री अविनाश गावित, सुनीता शिंपी, सुरेश भाबड, रविनभाई पटेल, राजु गिरासे, लाला माला, नाना निकम, डॅा नितीन पवार, गणेश राजे, सीमा रंगरेज, जाकिरमिया जहागीरदार, अल्ताफ पिंजरी, अमन रघुवंशी, रवि पावरा, सुकलाल भिल, विठोबा मोरे, दिलीप पवार, दिपक गिरासे, प्रतिक देसले, रविंद्र जावरे, रिशी शर्मा, संतोष मराठे, गोविंद शेवाळे, रणसिंग पाडवी, विक्रम पानपाटील, बि.के. पाडवी, बबलु कदमबांडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निंबा माळी सर यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नंदुरबार जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले असून, सेवा सप्ताहांतर्गत पुढील काही दिवस विविध सामाजिक, जनहित व संघटनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॅा अभिजीत मोरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments