Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेरच्या प्रभाग क्र. ३ मध्ये विकासकामांना गती; गटारीच्या कामाचा दिमाखात शुभारंभ!

 आमदार मंजुळा गावित यांच्या विशेष पाठपुराव्याला यश; नगरसेवक प्रशांत चौधरी व कौसर पठाण यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांची मागणी मार्गी

पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):

पिंपळनेर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. प्रभागातील गटारीच्या कामाचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला असून, यामुळे परिसरातील नागरी सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे.



शिवसेनेच्या आमदार सौ. मंजुळाताई गावित यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे तसेच स्थानिक नगरसेवक प्रशांत चौधरी व नगरसेविका सौ. कौसर याकूब पठाण यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे काम मंजूर होऊन प्रत्यक्षात सुरु झाले आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

अस्वच्छता अन् सांडपाण्याच्या समस्येतून सुटका

प्रभाग क्रमांक ३ मध्ये पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत न होणे, रस्त्यांवर सांडपाणी साचणे आणि त्यातून पसरणाऱ्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आरोग्याचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या गंभीर समस्येची दखल लोकप्रतिनिधींनी घेत तातडीने गटारीचे काम मंजूर करून घेतले. या भुमीगत गटारीच्या कामामुळे सांडपाण्याचा निचरा योग्य रीतीने होईल आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण लाभणार आहे.

"मी नगरसेवक नाही, तर जनसेवक!" – प्रशांत चौधरी

कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना नगरसेवक प्रशांत चौधरी म्हणाले, *"मी नगरसेवक म्हणून नाही, तर जनसेवक म्हणून जनतेच्या सेवेत आहे. विकास केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्ष नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत."*

सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात

या प्रसंगी लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले की, हा केवळ एका कामाचा शुभारंभ नसून प्रभाग क्र. ३ च्या सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे. येत्या काळात रस्ते, सक्षम गटारी व्यवस्था, सुरळीत पाणीपुरवठा आणि इतर आवश्यक नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल.



आमदार सौ. मंजुळाताई गावित, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेविका सौ. कौसर याकूब पठाण आणि सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रभागातील नागरिकांनी मनापासून आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments