हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी ग्राहकांना महागाची मिनरल वॉटरची बाटली खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या हॉटेल चालकांना आता चांगलाच चाप बसणार आहे. प्रशासकीय पातळीवर या संदर्भात अत्यंत कडक पावले उचलण्यात आली असून प्रत्येक हॉटेलमध्ये ग्राहकांना शुद्ध पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी ग्राहक हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना साधे पाणी न देता थेट मिनरल वॉटरची पाण्याची बाटली टेबलावर ठेवली जाते. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कडक प्रशासकीय भूमिकेचा संदर्भ देत आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांवर थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. कोणत्याही हॉटेलने मोफत आणि शुद्ध पाणी देण्यास नकार दिला किंवा पाण्यासाठी जादा पैसे आकारले, तर ग्राहकांना त्याविरोधात तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा तक्रारींवर तात्काळ दखल घेऊन संबंधित हॉटेलवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा देण्यात आला आहे.
**ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी पाहत राहा 'नवापूर गर्जना न्यूज'.**

Post a Comment
0 Comments