Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धुळे: देवपूर बस स्थानकावर सापडलेल्या १० वर्षीय 'आर्यन'च्या पालकांचा शोध सुरू; पोलिसांचे आवाहन

 सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे:देवपूर बस स्थानक परिसरात एका अंदाजे १० वर्षीय अनोळखी बालकाचा शोध लागला असून, त्याच्या पालकांचा शोध घेण्यासाठी देवपूर पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. दिनांक २१ जून २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास हा मुलगा देवपूर बस स्थानक येथे पोलिसांना मिळून आला. देवपूर पोलिसांनी त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. हा मुलगा केवळ त्याचे नाव 'आर्यन' एवढेच सांगत असून तो हिंदी भाषा बोलतो. याव्यतिरिक्त त्याला स्वतःबद्दल किंवा त्याच्या घराविषयी अधिक माहिती सांगता येत नाही. सध्या या बालकाला सुरक्षिततेच्या कारणास्तव बालगृह, साक्री रोड, धुळे येथे दाखल करण्यात आले आहे.



या मुलाच्या वर्णनाबाबत सांगायचे झाल्यास, त्याचा रंग सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे बारीक काळसर, केस काळे आणि शरीरयष्टी सडपातळ आहे. त्याची उंची साधारणपणे ३ फूट ८ इंच असून, त्याच्या अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट आहे.

या बालकाबाबत किंवा त्याच्या पालकांबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित देवपूर पोलीस ठाणे (०२५६२-२२८८२१९), पोलीस निरीक्षक समाधान वाघ (८८८८८०५१००), पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश गंगाधर चौधरी (९६०४६७३३३२) किंवा धुळे पोलीस नियंत्रण कक्ष (०२५६२-२८८२०७) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments