Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संतप्त चालकांचा इशारा पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन!

सहसंपादक अनिल बोराडे 

 पिंपळनेर-सेलबारी घाटाजवळील या महत्त्वाच्या मार्गावर सध्या वाहनचालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून काही अज्ञात लोकांकडून खुलेआम बेकायदेशीर वसुली सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्यावर वाहने अडवून चालकांना धमकावत जबरदस्तीने पैसे उकळले जात असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक आणि वाहतूकदार हैराण झाले आहेत.महत्वाची बाबा म्हणजे हे वसुलीखोर आपल्या प्राइवेट वाहनाने येतात 



मिळालेल्या माहितीनुसार, विशेषतः भरदिवसा रात्रीच्या वेळी मालवाहू वाहनांना टार्गेट करण्यात येत असून, “रस्ता खर्च”, “स्थानिक शुल्क” किंवा विविध कारणे सांगत चालकांकडून रोख रक्कम उकळली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या वसुलीसाठी कोणतीही अधिकृत पावती दिली जात नाही किंवा कोणताही शासकीय आदेश दाखवला जात नाही. काही ठिकाणी वाहनचालकांना दमदाटी करत गाड्या थांबवून पैसे देण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.


या प्रकारामुळे वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान होत असून चालकांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वाहनचालकांनी या रस्त्यावर भरदिवसा रात्री प्रवास करणे धोकादायक बनल्याचे सांगितले आहे. “पैसे दिल्याशिवाय पुढे जाऊ देत नाहीत, विरोध केला तर धमक्या दिल्या जातात,” असा आरोप काही चालकांनी केला आहे.


स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच या अवैध वसुलीमागील टोळीचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस प्रशासन नेमकी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही, तर वाहनचालक संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments