नवापूर : नवापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी नवापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी विशेष कंबर कसली असून त्यांच्या कामकाजाची तळमळ आता प्रत्यक्ष कृतीतून दिसून येत आहे. नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगातून त्यांच्या कार्यतत्परतेचा प्रत्यय नवापूरकरांना आला आहे. शहरात कचरा संकलित करणारी वाहने उघड्या स्वरूपात कचरा घेऊन जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत होती आणि रस्त्यावर कचरा सांडत होता. ही बाब निदर्शनास येताच नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी तात्काळ संबंधित विभागाला व कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या. त्यांनी कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांना नेट (जाळी) बांधूनच कचरा बाहेर नेण्याचे आदेश दिले, जेणेकरून शहरात अस्वच्छता पसरणार नाही. त्यांच्या या सूचनेनंतर तात्काळ अंमलबजावणी करण्यात येऊन सुरक्षितरीत्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात झाली आहे.
![]() |
| पुर्वी |
![]() |
| आता |
नगराध्यक्ष जयवंत जाधव हे शहराच्या विकासासाठी छोट्या-छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन कामकाज करीत आहेत. केवळ मोठे विकास प्रकल्पच नव्हे, तर दैनंदिन स्वच्छतेच्या प्रश्नावरही त्यांचा कडक वचक असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. येणाऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात नवापूर शहराला 'सुंदर शहर आणि स्वच्छ शहर' बनवण्याचा संकल्प त्यांनी सोडला असून त्या दिशेने त्यांची पाऊले पडत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून कामाप्रती असलेली ही तळमळ पाहून नवापूर शहरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात नवापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्या सहकार्याने शहराचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार नगर परिषदेमार्फत विविध स्तरावर नियोजनाला सुरुवात झाली असून स्वच्छ नवापूर आणि सुंदर नवापूर हे स्वप्न लवकरच सत्यात उतरताना दिसेल असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments