Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेरमध्ये भाजपचा ४७ वा स्थापना दिन 'सेवा दिन' म्हणून साजरा; रुग्णांना फळवाटप व स्वच्छता अभियानाचा उपक्रम

 पिंपळनेर :भारतीय जनता पार्टीच्या ४७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून पिंपळनेर ग्रामीण मंडळाच्या वतीने सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवण्यात आले. 'राजकारणासोबत समाजकारण' हा मंत्र जपत पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप आणि रुग्णालय परिसरात व्यापक स्वच्छता अभियान राबवून कार्यकर्त्यांनी सेवाभावाचा एक अनोखा संदेश दिला.



स्वच्छता आणि रुग्णसेवा

कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण रुग्णालय परिसरातील स्वच्छता अभियानाने झाली. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन संपूर्ण परिसर चकाचक केला. त्यानंतर रुग्णालयातील विविध कक्षात जाऊन रुग्णांची विचारपूस करण्यात आली व त्यांना फळवाटप करून मानसिक आधार देण्यात आला. या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त होत आहे.



सेवा हीच संघटनेची ओळख - डॉ. योगिताताई चौरे

याप्रसंगी पिंपळनेरच्या प्रथम नगराध्यक्षा डॉ. योगिताताई चौरे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या की, "भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्तेसाठी काम करणारी राजकीय संघटना नसून समाजसेवेचे व्रत घेतलेली संघटना आहे. अंत्योदयाचा विचार घेऊन तळागाळातील लोकांची सेवा करणे हीच आपली खरी ओळख आहे."

दिग्गजांची उपस्थिती

या सेवाभावी कार्यक्रमाला भाजप धुळे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रदीप बाबा कोठावदे, उपाध्यक्षा प्रा. सविताताई पगारे, महिला मोर्चा सरचिटणीस सुवर्णाताई आजगे, व्यापार उद्योग आघाडीचे कोषाध्यक्ष जगदीश धामणे, आणि ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हेमराज दशपुते यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

यांची लाभली उपस्थिती

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जितेश चौरे, नगरसेविका प्रज्ञा शेखर बाविस्कर, आशा महाजन, मोतिलाल पोतदार, पहेलवान संभाजीराव ढोले, दीपक पवार, मंडळ अध्यक्ष इंजि. विकी दादा कोकणी, ग्रामीण मंडळ सरचिटणीस धनंजय घरटे, उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे, योगेश भामरे, डॉ. राजेंद्र पगारे, नितीन कोतकर, चंद्रशेखर बाविस्कर, रामकृष्ण एखंडे, महेंद्र सोनवणे, वसंतदादा अहिरे, योगेश कोठावदे, विनोद दुसाने, सय्यद सर, गुलाब चौरे, माजी पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, मेहरबान अली, महाले सर, चेतन पगारे, टिनु नगरकर, दत्तु भाऊ पवार, आबा पगारे आणि सलीम पटेल यांच्यासह ग्रामीण व शहरी भागातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




या अभिनव उपक्रमामुळे पिंपळनेर परिसरात भाजपच्या स्थापना दिनाला सामाजिक स्वरूप प्राप्त झाले असून, सर्व स्तरातून या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments