Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदे येथील न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'सामाजिक समता सप्ताह' उत्साहात संपन्न

 **तळोदे (प्रतिनिधी):**

अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित, स्वातंत्र्यसेनानी प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. माळी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, तळोदे येथे 'सामाजिक समता सप्ताह' सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जन्मवर्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता


सामाजिक न्याय विभाग (महाराष्ट्र शासन), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे तसेच समाज कल्याण विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान या समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

### **मान्यवरांची उपस्थिती आणि अभिवादन**

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संस्थेचे प्रेरणास्थान कै. प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन (बाबाजी) आणि कै. माईसाहेब महाजन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार समाज कल्याण विभागाच्या **श्रीमती कल्पना ठाकरे** उपस्थित होत्या, त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.



### **मार्गदर्शन व प्रेरणा**

संस्थेच्या अध्यक्षा **माननीय सौ. मंगलाताई अरुणकुमार महाजन**, संस्थेचे आधारस्तंभ तथा कॉलेज ट्रस्टचे संचालक **आदरणीय श्री. अरुणकुमार गोरखनाथ महाजन** आणि ज्येष्ठ संचालक मंडळाने या उपक्रमास शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य **डॉ. श्री. अमरदीप अरुणकुमार महाजन** यांच्या नेतृत्वाखाली व इंग्लिश विभाग प्रमुख **डॉ. शितलताई महाजन**, उपमुख्याध्यापक **श्री. एस. एस. सूर्यवंशी** यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले.

प्रमुख अतिथी श्रीमती कल्पना ठाकरे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे महत्त्व पटवून दिले आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन करत अनमोल मार्गदर्शन केले.

### **उपस्थित मान्यवर**

या कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री. पी. आर. वळवी, प्रा. श्री. ए. एल. महाजन, विज्ञान विभाग प्रमुख श्री. एन. एस. शिंपी, कला विभागप्रमुख श्री. एस. बी. मगरे, सांस्कृतिक समिती प्रमुख श्री. एस. डी. महाजन, श्री. ए. व्ही. गिरासे, श्रीमती एम. ए. राणे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन **श्रीमती एम. जी. सोनवणे** यांनी केले.

Post a Comment

0 Comments