Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेर व ककाणी येथे भारतीय किसान संघातर्फे ‘भारत माता पूजन’ उत्साहात संपन्न

 पिंपळनेर:भारतीय किसान संघाच्या वतीने देशभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या चार प्रमुख उत्सवांपैकी एक असलेल्या 'भारत माता पूजन' सोहळा २६ जानेवारी निमित्त पिंपळनेर आणि ककाणी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय किसान संघाच्या ग्राम समितीने या दोन्ही ठिकाणी कार्यक्रमांचे नेटके नियोजन केले होते.



पिंपळनेर येथील सोहळा

पिंपळनेर येथे भारतीय किसान संघाचे प्रांत मंत्री सुभाष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना सुभाष महाजन यांनी भारत माता पूजनाचे महत्त्व आणि त्यामागची भावना विषद केली.

याप्रसंगी पिंपळनेर ग्राम समितीचे मंत्री सुभाष जगताप, जिल्हा सहमंत्री प्रा. डॉ. सुरेश अहिरे, जिल्हा प्रचार व प्रसिद्धी प्रमुख प्रा. शिवप्रसाद शेवाळे, तालुका कार्यकारणी अध्यक्ष ए. पी. दशपुते, सदस्या श्रीमती वैशाली कोरडे, साक्री तालुका मंत्री जगदीश सोनवणे, कल्पना नंदन आणि ग्राम समिती सदस्य शिरीष कुवर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


ककाणी येथेही उत्साह

साक्री तालुक्यातील ककाणी येथे सायंकाळी ७ वाजता भारत माता पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष शांताराम शिंदे व दीपक शिंदे यांनी केले होते.

संघटना परिचय: प्रा. शिवप्रसाद शेवाळे यांनी उपस्थितांना भारतीय किसान संघाच्या ध्येय-धोरणांची ओळख करून दिली.

मार्गदर्शन: प्रा. डॉ. सुरेश अहिरे यांनी भारत माता पूजनाच्या परंपरेवर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय मनोगत: तालुका अध्यक्ष ए. पी. दशपुते यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संघटनेची कार्यपद्धती आणि शेती क्षेत्रातील महत्त्वाचे 'दादा लाड कापूस तंत्रज्ञान' यावर सविस्तर माहिती दिली.

उपस्थित मान्यवर

या सोहळ्याला म्हसदि ग्राम समिती अध्यक्ष किशोर शिवाजी देवरे, सुभाष जगताप, ककाणी ग्राम समिती अध्यक्ष यशवंत बाबुलाल बेडसे, विठ्ठल यशवंत बेडसे, रमेश पांडुरंग बेडसे, पुंडलिक बाळू बेडसे, हिम्मत दामू बेडसे, दिगंबर दगा बेडसे, दादाजी दामू बेडसे, उत्तम लक्ष्मण बेडसे आणि शांताराम रूपा बेडसे यांसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशभक्ती आणि शेतकरी एकता यांचा जागर करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Post a Comment

0 Comments