Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विजयाचा आनंद आणि गणेश जयंतीचा योग! नवापुरात लोकनेते भरत गावीत यांच्याकडून भव्य भंडारा; गरजूंच्या घरी पोहोचणार 'प्रसादाचा डबा

 संपादकीय

नवापूर:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाचे औचित्य आणि येणाऱ्या गुरुवारी असलेल्या गणेश जयंतीचे पावन पर्व साधून लोकनेते भरत गावीत यांच्या वतीने नवापूर शहरात भव्य भंडारा आणि महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विजयाचा हा गुलाल आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद या दोन्हीचा आनंद शहरातील प्रत्येक नागरिकाला घेता यावा, या उदात्त हेतूने २२ जानेवारी २०२६ रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.



नवापूर शहरातील आराध्य दैवत गणपती मंदिरात सायंकाळी ७ वाजेपासून या महाप्रसादाला सुरुवात होईल. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लोकनेते भरत गावीत यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी. शहरातील जे वृद्ध नागरिक किंवा दिव्यांग बांधव शारीरिक मर्यादांमुळे मंदिर परिसरापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी प्रशासकीय स्तरावर विशेष नियोजन करून घरपोच डब्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून प्रसादाच्या या पवित्र मंगलप्रसंगी कोणीही वंचित राहणार नाही.

नवापूर शहराची एकता अधिक घट्ट करण्यासाठी मुस्लिम बांधवांसाठी इस्लामपूरा आणि डिंगबर पाडवी ग्राऊंडवर स्वतंत्र भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर आयोजित या महाप्रसादाचा लाभ शहरातील सर्व मायबाप जनतेने घ्यावा, असे आवाहन लोकनेते भरत गावीत यांच्या वतीने करण्यात आले आहे. राजकारणासोबतच माणुसकीची जपवणूक करणारा हा सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Post a Comment

0 Comments