सहसंपादक अनिल बोराडे
हिंदुस्थानी स्पोर्ट्स अँड जुडो कराटे असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. संभाजी शिवाजी अहिरराव यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर परिसरात विविध सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रविकिरण महाराज यांचे कीर्तन
वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ०७:०० वाजता खान्देशातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रविकिरण महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूल, पिंपळनेर येथे पार पडणार आहे.मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर सामाजिक बांधिलकी जपत, तुळसी आय हॉस्पिटल (नाशिक) आणि राजे छत्रपती स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, व चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तपासासाठी वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत.
ठिकाण: प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडाशी (ता. साक्री, जि. धुळे).
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आमदार मंजुळाताई गावित, डॉ. तुळशीराम गावित, विशाल देसले, इंजि. सागर गावित, ज्ञानेश्वर एखंडे आणि पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून राजे छत्रपती स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पाटील, कर्मचारी वृंद आणि राजे छत्रपती मित्र परिवाराने सर्व नागरिकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे


Post a Comment
0 Comments