Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

२६ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून; धुळे जिल्ह्यात खळबळ

 सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे: धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील कोडीद ग्रामपंचायतीत असलेल्या तेल्यामहू पाड्यात २६ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नानासिंग सहयजा पावरा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



घटनेचा तपशील

नानासिंग पावरा याचा मृतदेह पाड्याजवळील रस्त्याच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. अज्ञात व्यक्तीने त्याच्या पोटावर, डोक्यावर आणि छातीवर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

अनिल बोराडे,

धुळे जिल्हा.

मो. ८००७००२८८१

Post a Comment

0 Comments