सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर:भारतीय किसान संघ महाराष्ट्र राज्य तर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी दिनांक 18/ 9 /25 रोजी निवेदन देण्यात आले
यात अप्पर तहसीलदार पिंपळनेर येथे भारतीय किसान संघातर्फे तहसीलदार दत्तात्रय शेजुळ व साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना साक्री येथे निवेदन देण्यात आले. यात पीएम एएसएचए आधारित एम एस पी भावाने सोयाबीन ,भात, कडधान्य ,मका ,कापूस खरेदी करणे अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांचे पंचनामे झालेले आहे त्यांना त्वरित त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणे ,गत वर्षी प्रमाणे विमा च्या तरतुदी पूर्ववत ठेवणे ,ई पीक पाहणी ती मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवणे ,एप्रिल मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या कांद्याच्या नुकसानीची भरपाई देणे, शेतमाल भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांदा पिकाला दर प्रतिक्विंटल 1000 रुपये अनुदान अनुदान मिळावे ,तसेच शेतकऱ्याचा कडा पूर्णपणे विकला जाईपर्यंत नाफेड व एनसीसीएफने कांदा बाजारात आणू नये. कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव मिळावा. कांदा निर्यात बंदी न करता इतर देशांशी सल्ला मसलत करून कांदा निर्यातच प्रमाण वाढवावं अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय किसान संघाचे तालुका अध्यक्ष ए पी दशपुते ,भारतीय किसान संघाचे जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख प्रा. शिवप्रसाद शेवाळे जबापूर ग्राम समिती प्रमुख प्रकाश चिमणराव पाटील ,पिंपळनेर ग्राम समिती प्रमुख जगदीश प्रताप गांगुर्डे, पिंपळनेर शहर मंत्री सुभाष जगताप , जबापूर ग्राम समिती सदस्य उमाकांत राजाराम भदाणे ,जिल्हा कार्यकारणी सदस्य विश्वास वेडू पाटील ,प्रांत कार्यकारणी सदस्य साहेबराव देवचंद पवार, तालुका कार्यकारणी सदस्य धनराज रमेश पाटील, अनिल सुदाम बोराडे, सामोडे ग्राम समिती प्रमुख चंद्रकांत घरटे, दीपक राजाराम भदाणे तसेच तसेच पिंपळनेर जेबापूर, बल्हाणे, सामोडे व परिसरातील शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच साखरी येथे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना जिल्हा कार्यकारणी सदस्य दुल्हभ जाधव, जिल्हा कार्यकारणी सदस्य योगेंद्र गिरासे, दादाभाई पाटील व निजामपूर, जैताणे, खुडाणे, छावडी येथील किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
Post a Comment
0 Comments