सहसंपादक अनिल बोराडे
सामोडे, (प्रतिनिधी) - जयदया शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सामोडे (ता. साक्री, जि. धुळे) येथे गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी BOSCH कंपनी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस मुलाखतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मुलाखतीमध्ये विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता.
या मुलाखतीसाठी इलेक्ट्रिशियन, फिटर आणि वेल्डर या ट्रेडमधील प्रशिक्षणार्थी पात्र होते. सामोडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ३१ प्रशिक्षणार्थी, आर.ओ. निकम औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे येथील एक, शांतीवन औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेवाळी येथील एक, आणि शांताई औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपळनेर येथील एक, अशा एकूण ३४ प्रशिक्षणार्थींची BOSCH कंपनीतर्फे निवड करण्यात आली.
BOSCH कंपनीकडून ट्रेनिंग व डेव्हलपमेंट मॅनेजर श्री. अनंत दांडेकर यांनी प्रशिक्षणार्थींच्या मुलाखती घेतल्या. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री. प्रकाश शिंदे, अध्यक्ष श्री. अनिल शिंदे, सचिव श्री. शरद शिंदे, श्री. संजय शिंदे, श्री. हंसराज शिंदे आणि इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आय.टी.आय. चे प्राचार्य श्री. योगेश सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, प्रशासकीय अधिकारी श्री. भगवान देवरे व श्री. गोकुळ मोरे, श्री. सी.के. सोनवणे, श्री. महारु चौरे, श्री. सचिन सोनवणे, श्री. चेतन सूर्यवंशी, श्री. महेंद्र चौरे इत्यादी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments