सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: मातंग समाजाचे प्रेरणास्थान, थोर साहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त पिंपळनेर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या विविध भागांत त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांच्या महान कार्याला आणि विचारांना उजाळा देण्यात आला.
पिंपळनेर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात पिंपळनेर शहर मातंग समाज आणि नगरपरिषदेतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरपरिषद प्रशासक दीपक पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) किरण बर्गे यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी धर्मजागरण संस्था, जळगाव, लहुजी प्रबोधन मंच, देवगिरी प्रांत, पिंपळनेर तालुका पत्रकार संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात समाजबांधवांना कॅलेंडरचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना सुधीर चांदणे यांनी अण्णाभाऊंच्या कार्याची महती सांगितली. ते म्हणाले, "केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी ३५ कादंबऱ्या, १४ लोकनाट्ये, १३ कथासंग्रह, १० पोवाडे, ७ चित्रपट कथा आणि १ प्रवासवर्णन अशा विपुल साहित्याची निर्मिती केली. त्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर 'ये आझादी जुटी है, देश की जनता भुकी हैं' अशी परखड भूमिका मांडली. त्यांनी रशियात शिवरायांचे चरित्र सांगितले. समाजाने त्यांच्या विचारांवर चालून आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवून शिक्षित करावे."
मान्यवरांकडून प्रतिमा पूजन
सायंकाळी पिंपळनेर येथील सामोडे चौफुली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, माजी सरपंच विजुनाना गांगुर्डे आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांच्या हस्ते लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमांना पिंपळनेर नगरपरिषदेचे अधिकारी दीपक पाटील, संभाजी अहिरराव, माजी सरपंच योगेश नेरकर, माजी सभापती संजय ठाकर, ज्ञानेश्वर ऐखंडे, माजी पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, अबा पाथरे, डॉ. पंकज चोरडिया, पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार सुभाष जगताप, पत्रकार एस. डी. पाटील, प्रा. शिवप्रसाद शेवाळे, शिवाजी जिरे, दिलीप बोळे, अनिल बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुधीर चांदणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे नागो लोणारे, सुधीर चांदणे, बंटी अहिरे, प्रकाश लोणारे, महेंद्र शिरसाठ, कुणाल अहिरे, रवि शिरसाठ, वाल्मीक मरसाळे, घनश्याम पगारे, यशराज बोराडे, सुरेश शिरसाठ, भगवान शिरसाठ, विजू लोणारे, गोकूळ जाधव, नाना जाधव, नाना लोणारे, राजू जाधव, पत्रकार अनिल बोराडे, गोकूळ दाणी, प्रविण सोनवणे, चंद्रकांत खरोटे, भटुभाऊ पवार, रवी मालुसरे, विष्णू पवार, सुभाष हिरे, नितीन नगरकर आणि महिला समाजबांधवांसह अनेक नागरिकांनी परिश्रम घेतले. सर्वांनी अण्णाभाऊंच्या कार्याला अभिवादन केले.
Post a Comment
0 Comments