Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जी.टी. पाटील महाविद्यालयातर्फे लोकनेते स्व. दादासाहेब रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

सहसंपादक अनिल बोराडे 

 नंदुरबार (प्रतिनिधी) - येथील जी.टी. पाटील महाविद्यालयामध्ये लोकनेते स्व. दादासाहेब बटेसिंह रघुवंशी यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार तालुका विधायक समिती शैक्षणिक परिवार, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले.



शिबिराचे उद्घाटन नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हा. चेअरमन मनोजभैय्या रघुवंशी, संचालक रामभैय्या रघुवंशी, किरण रघुवंशी, डॉ. तुषार रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, प्राचार्य डॉ. एम.जे. रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ. एम.एस. रघुवंशी, कार्यालयीन अधीक्षक प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. संदिप पाटील, तसेच नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ. वडीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराला विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रीय छात्र सैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी अशा एकूण १०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून 'रक्तदान हेच श्रेष्ठदान' या विचाराला मूर्त रूप दिले.

स्व. दादासाहेब रघुवंशी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे समन्वयक म्हणून एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. विजय चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्यासोबत राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. सुलतान पवार, डॉ. मनोज शेवाळे, सहायक अधिकारी डॉ. माधव वाघमारे, प्रा. जितेंद्र पाटील, महिला अधिकारी डॉ. संगीता पिंपरे व राजश्री बाविस्कर, अंतर्गत गुणवत्ता विभागाचे प्रमुख डॉ. एम.आर. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रुपेश देवरे, आणि क्रीडा अधिकारी डॉ. तारक दास यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments