सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार येथील श्री बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ९ ऑगस्ट, २०२५ रोजी जागतिक आदिवासी दिवस आणि क्रांती दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आदिवासी समाजाचे योगदान आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.डी. चौधरी सर होते. त्यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजातील महान क्रांतिकारक बिरसा मुंडा आणि शिरीष मेहता यांच्या अतुलनीय योगदानाला आदराने उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, या वीरांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. तसेच, त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, वीर भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांसारख्या तेजस्वी क्रांतिकारकांचेही स्मरण केले.
याप्रसंगी डॉ. चौधरी यांनी आदिवासी बांधवांना संविधानाद्वारे मिळालेल्या अधिकारांविषयी मार्गदर्शन केले. हे अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशा तिवारी यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. के.एस. मराठे यांनी मानले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री चंद्रकांतजी रघुवंशी, उपाध्यक्ष मा.श्री मनोजभैय्या रघुवंशी तसेच संचालक मंडळाने प्रोत्साहन दिले.
Post a Comment
0 Comments