Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेरमध्ये मोकाट गुरांचा हैदोस, ज्येष्ठ नागरिक संघटनेची तातडीने कारवाईची मागणी

 सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर शहरात मोकाट गुरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बाजारपेठा, महामार्ग आणि शहरातील विविध भागांमध्ये शेकडो मोकाट गुरांचे कळप बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच लहान मुले, वृद्ध नागरिक आणि पादचाऱ्यांसाठी ही गुरे धोकादायक बनली आहेत. या गंभीर समस्येवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी दीपस्तंभ ज्येष्ठ नागरिक संघटनेने पिंपळनेर नगर परिषद प्रशासक आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याकडे केली आहे.



आषाढी एकादशीच्या दिंडीत विद्यार्थ्यां जखमी:

ज्येष्ठ नागरिक संघटनेने दिलेल्या निवेदनात, मोकाट गुरांच्या त्रासाचे अनेक दाखले दिले आहेत. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या दिंडीमध्ये एका माजलेल्या गुराने धडक दिल्याने पाच विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरून चालणे देखील आता नागरिकांसाठी असुरक्षित बनले आहे. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांना फिरताना किंवा भाजीपाला घेऊन जात असताना, ही जनावरे धाडस करून त्यांच्या हातातील पिशव्या हिसकावून घेत आहेत.

कळवणमधील घटनेची पुनरावृत्ती टाळण्याची मागणी:

कळवण येथे मोकाट गुरांनी एका वृद्धास चिरडून मारल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. अशी पुनरावृत्ती पिंपळनेर शहरात होऊ नये यासाठी दीपस्तंभ ज्येष्ठ नागरिक संघटनेने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाला निवेदन:



या पार्श्वभूमीवर, दीपस्तंभ ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पिंपळनेर नगर परिषद प्रशासक दीपक पाटील यांची भेट घेऊन त्यांना या समस्येबाबतचे निवेदन दिले. तसेच, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे आणि डीवायएसपी संजय बांबळे यांनाही लेखी निवेदन देऊन मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली.

यावेळी दीपस्तंभ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र मराठे, व्ही.एन.जिरे, सुभाष जगताप, पी.जी.पाटील, दिपक सोनवणे, देविदास नेरकर, दीपक खरोटे, शशिकांत भदाणे, ए.बी.मराठे, रामू शेठ वाणी, प्रताप गांगुर्डे, विजय गांगुर्डे, बाळकृष्ण सैंदाणे, निंबा बोरसे आदी सदस्य उपस्थित होते. या निवेदनामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments