सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर, ११ जुलै २०२५: वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी, जमीन आणि खनिजे यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड ताण येत आहे. जास्त लोकसंख्येमुळे प्रदूषण वाढते आणि त्याचे सर्वच सजीवांवर दुष्परिणाम होतात. याच पार्श्वभूमीवर जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पिंपळनेर येथील कर्म. आ.मा.पाटील कला,
वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आयक्यूएसी विभाग आणि अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकसंख्या वाढीचा वेग रोखण्यासाठी समाजात याविषयी प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत प्राचार्य डॉ. लहू पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू पवार होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, लोकसंख्येच्या बाबतीत आपला भारत देश एक अब्ज चौरेचाळीस कोटी या आकड्यासह जगात पहिल्या क्रमांकावर आहे, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी लोकसंख्या वाढीचे फायदे आणि तोटे यावरही प्रकाश टाकला.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एल. जे. गवळी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय तोरवणे, डॉ. नितीन सोनवणे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एस. पी. खोडके आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सतीश मस्के, डॉ. आनंद खरात, प्रा. एम. व्ही. बळसाणे, डॉ. योगेश्वर नांद्रे, प्रा. सी. एन. घरटे, डॉ. कृष्णा वसावे, प्रा. डी. बी. जाधव, प्रा. प्रथम सूर्यवंशी, प्रा. भूषण वाघ, प्रा. तुषार तोरवणे, शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एल. जे. गवळी यांनी प्रास्ताविक केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय तोरवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर आयक्यूएसी समन्वयक डॉ. एस. पी. खोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post a Comment
0 Comments